Video: फडणवीस-पवार दिल्लीत, शिंदे मात्र मुंबईत; चाललंय काय? मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट!
महाराष्ट्रात मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत भेटीगाठी घेत असताना, एकनाथ शिंदे महाराष्ट्रात आहेत. फडणवीसांनी पंतप्रधान मोदींसह भाजपाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणताही तिढा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गृहखातं कोणाकडे जाणार याबाबत मात्र त्यांनी बोलणं टाळलं.