देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, “काही लोक फक्त मराठी माणसाचं नाव घेतात आणि…”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील स्वयंपूर्ण विकास प्रकल्पांसाठी तीन वर्षांसाठी व्याजमाफी जाहीर केली. यामुळे मध्यमवर्गीय आणि मराठी माणसांना हक्काचं घर मिळेल असं त्यांनी सांगितलं. फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचं कौतुक केलं आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला. काही लोक फक्त मराठी माणसाचं नाव घेतात पण करत काहीही नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.