धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला…
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे सध्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती, ज्यात न्यायालयाने करुणा मुंडे यांना मासिक १.२५ लाख रुपये देखभाल खर्च देण्याचे निर्देश दिले. यावर त्यांचा मुलगा सीशिव मुंडेने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून वडिलांचे समर्थन केले.