एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; नेते म्हणाले, “परिस्थिती जटील, पक्षाचा निर्णय…”
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांना घशाचा संसर्ग, ताप आणि अशक्तपणा आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई यांनी सांगितले की, शिंदेंनी सव्वादोन वर्षे सातत्याने काम केल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. ५ तारखेच्या शपथविधीला उपस्थित राहण्याबाबत डॉक्टर निर्णय घेतील.