“धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
२०२१ मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह भाजपाला समर्थन दिलं. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेतील बंडखोरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आणि एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्षचिन्ह मिळालं. अमित ठाकरे यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे.