आधी राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची भेट, नंतर नेत्यांची सूचक विधानं; महायुतीत मनसे येणार का?
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंच्या नाराजीचे तर्क लावले जात असताना, मंगळवारी रात्री उशीरा शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे यांनी राजकीय चर्चा नसल्याचे सांगितले, मात्र त्यांच्या विधानांमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले. मनसेचे संदीप देशपांडे यांनी विचारांची तफावत नसल्याचे सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.