उपमुख्यमंत्री अन् मंत्रिमंडळाचं काय? एकनाथ शिंदे म्हणाले…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजपाने घ्यावा, तोच अंतिम असेल. त्यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून सरकार स्थापनेत अडचण येणार नाही असं सांगितलं. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या चर्चेसाठी उद्या दिल्लीत बैठक होणार आहे.