“लाडकी बहीण योजनेवरुन आशा भोसलेंनी सावत्र भावांना चपराक…”, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेची माहिती दिली. या योजनेत २ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे वळते केले आहेत. आशा भोसले यांनीही या योजनेचे कौतुक केले आणि त्यांच्या खडतर जीवनाची आठवण सांगितली. शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आणि योजनेला विरोध करणाऱ्यांना आशा भोसलेंनी चपराक लगावली असंही एकनाथ शिदेंनी म्हटलं आहे.