एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती; “लाडक्या बहिणींना २१०० रुपये…”
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागांचं प्रचंड बहुमत मिळालं. या यशात "माझी लाडकी बहीण" योजनेचा मोठा वाटा आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१०० रुपये लवकरच देण्याचं आश्वासन दिलं आहे. निकषात बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.