एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीम शर्मांच्या पत्नीला एकनाथ शिंदेंची विधान परिषदेची ऑफर
माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वकृती शर्मा यांनी अंधेरी पूर्व मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेवर संधी देण्याचे वचन दिल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. स्वकृती शर्मा यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि समाजसेवेत गेल्या १० वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगितले.