फास्टॅग लावा अन्यथा दुप्पट पैसे भरा; मुंबईतील ‘या’ टोलनाक्यांवर फास्टॅग अनिवार्य!
१ एप्रिल २०२५ पासून सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट शुल्क आकारले जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पाच टोलनाक्यांवर शाळेच्या बस आणि हलक्या वाहनांना टोलमाफी आहे, परंतु वांद्रे-वरळी सी लिंक आणि अटल सेतूवर सर्व वाहनांसाठी फास्टॅग आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.