राज्यात काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांसमोर दुहेरी आव्हान, गिरीश कुबेर यांचं विश्लेषण
काँग्रेसनं हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. संपादक गिरीश कुबेर यांच्या मते, सपकाळ यांची निवड आर्थिक गैरव्यवहारांपासून दूर राहणाऱ्या नेत्याच्या विचारातून झाली आहे. सपकाळ यांच्यासमोर पक्षसंघटनेचं अस्तित्व टिकवणं आणि वाढवणं हे दुहेरी आव्हान आहे. त्यांना पक्ष जोडणं आणि नवीन माणसं जोडणं यावर भर द्यावा लागेल.