‘भाजपात आल्यावर शांत झोप लागते’ म्हणणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा पक्षाला ‘राम राम’; म्हणाले..
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांनी आता भाजपाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे. भाजपामध्ये आल्यावर "शांत झोप लागते" असे विधान करणारे पाटील यांनी पत्रकार परिषदेत त्याबाबत 'नो कमेंट्स' असे उत्तर दिले. उमेदवारीबाबत अनिश्चितता आणि सत्ताधारी गटातील इच्छुकांची वाढती संख्या यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.