सैफच्या हल्लेखोरांपर्यंत पोलीस कसे पोहोचले? वाचा थरारक घटनाक्रम!
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास याला ठाण्यातून अटक करण्यात आली. आरोपी बांगलादेशी नागरिक असून घुसखोरी करून भारतात आला होता. त्याने वरळीतील स्टॉलवर युपीआय पेमेंट केल्याने पोलिसांना त्याचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून जंगलातून अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला.