शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का? विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही आजही…”
२०२३ मध्ये अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळं होऊन युतीत प्रवेश केला आणि उपमुख्यमंत्री झाले. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली, ज्यात सुप्रिया सुळे विजयी झाल्या. सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील एकतेबद्दल सांगितलं की, कौटुंबिक संबंध कायम आहेत आणि राजकीय मतभेद घरात येऊ दिलेले नाहीत. अजित पवारांच्या मवाळ भूमिकेवर त्यांनी स्वागत केलं.