उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना आणि एकनाथ शिंदेंना टोला, “बाळासाहेबांच्या फोटोशिवाय…”
उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या टिझरमध्ये बाळासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या फोटोचा वापर केल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावत म्हटलं की, "बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावाचून पर्याय नाही. हे अनेकांना लक्षात आलं आहे" तसेच, एकनाथ शिंदेंच्या गटाला गद्दार सेना म्हणत, भाजपाने हिंदुत्व सोडल्याचा आरोपही केला.