कोकणात जाण्यासाठी विशेष आणि जादा विशेष गाड्यांची सोय
होळीच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांचे तिकीट आरक्षण २४ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. गर्दीचा भार कमी करण्यासाठी अतिरिक्त विशेष गाड्याही धावणार आहेत. उधना जंक्शन-मंगळुरू दरम्यान द्वि-साप्ताहिक विशेष गाडी २ मार्चपासून २९ जूनपर्यंत चालवली जाणार आहे. या गाड्यांसाठी विशेष शुल्क आकारले जाणार आहे.