Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर फडणवीसांची टिप्पणी!
मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून सर्व आमदारांना शपथ देण्यात आली. अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांनी भाषणात टोलेबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल टिप्पणी करत हशा पिकवला. जयंत पाटील यांनी नार्वेकरांच्या कर्तबगारीवर प्रश्न उपस्थित केला. नार्वेकरांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर विधानपरिषदेचे सभापती आहेत, यावरूनही चर्चा रंगली.