मनसे कार्यकर्त्याच्या हत्येला अजित पवारांचा नेता जबाबदार? जितेंद्र आव्हाडांकडून नाव जाहीर
ठाण्यातील राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची नोव्हेंबर २०२० मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी ओसामा शेखला अटक करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात नजीब मुल्ला यांचे नाव घेतले आहे. त्यांनी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. आव्हाड यांनी पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.