जितेंद्र आव्हाडांचं संजय राऊतांना उत्तर, “शरद पवारांबाबत विश्वासघातकी वगैरे हे शब्द…”
दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावर संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली. त्यांनी शिंदेंना सन्मानित केल्याने वेदना झाल्याचे सांगितले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देत शरद पवार सूड, द्वेष ठेवत नाहीत असे सांगितले. पवार राजकारणात कप्पे करतात आणि राजकीय व सामाजिक कप्पे वेगळे ठेवतात, असेही आव्हाड म्हणाले.