करुणा मुंडेंचा दावा, “अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडून राजीनामा लिहून घेतला आहे..”
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा न्यायालयाने निकाल दिला आहे. करुणा धनंजय मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा उद्या सादर होईल असे म्हटले आहे. अजित पवारांनी तो राजीनामा लिहून घेतल्याचा दावा केला आहे. करुणा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली असून, राजीनामा न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.