कुणाल कामराने उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “मेरी नजरसे तुम देखो तो गद्दार..”
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन करणारं गाणं म्हणताना दिसतो. या गाण्यात शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला आहे. खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कामराने शिंदेंचं नाव घेतलं नसूनही, गाण्यातील वर्णनामुळे तो शिंदेंबाबतच बोलतोय हे स्पष्ट आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.