कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरे यांनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी पोलिसांनी बसमधील सीसीटीव्ही कॅमेरेचा डिव्हीआर जप्त केला आहे. आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदवले असून, आणखी जबाब नोंदवले जाणार आहेत. चालकाने मद्यपान केल्याने अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू व ४० जण जखमी झाले आहेत. आरोपी चालकाला ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.