चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघाताचा तपास सुरू आहे. चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबल्याने अपघात घडला. या अपघातात सात जण ठार, तर ४९ जखमी झाले. बसने २१ मोटरगाड्या आणि एका हातगाडीचे नुकसान केले. चालकाला अटक करण्यात आली असून, २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आणि परिवहन विभाग अपघाताचे कारण शोधत आहेत.