लाडक्या बहिणींना २१०० रुपये कुठल्या महिन्यापासून मिळणार? मुख्यमंत्र्यांचं उत्तर..
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. या योजनेत पात्र महिलांना १५०० रुपये दिले जातात. महायुतीने निवडणुकीनंतर २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. अजित पवार यांनी महिलांना आर्थिक उपक्रमांसाठी प्रोत्साहन देण्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.