लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र आहेत त्यांना..”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चर्चेत राहिली. महिलांना दरमहा १५०० रुपये देणारी ही योजना बंद होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ४० ते ४५ हजार कोटींचा भार पडला आहे. अपात्र महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही, मात्र आत्तापर्यंत दिलेला निधी परत मागणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.