लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा; २१०० रुपये कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात आजपासून दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निधी अडकला होता, परंतु नव्या सरकारने योजना पुन्हा कार्यान्वित केली आहे. १२.८७ लाख बहिणींच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून उर्वरित लाभार्थ्यांना दोन-तीन दिवसांत मिळणार आहे. आधार प्रमाणीकरणामुळे वंचित महिलांनाही आता लाभ मिळणार आहे.