ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोट्यवधी अर्ज आल्याने सप्टेंबरमध्येही अर्ज करण्याची संधी देण्यात आली. मात्र, आता फक्त अंगणवाडी सेविकाच अर्ज भरू शकणार आहेत. नारी शक्ती अॅप आणि संकेतस्थळ बंद असल्याने महिलांनी जवळच्या अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घ्यावा लागणार आहे. पात्र महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत.