तुमच्या वडिलांची योजना आहे का?” अजित पवारांचा काँग्रेसवर संताप
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलैपासून सुरू झालेल्या या योजनेत दीड कोटीहून अधिक महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीने योजनेवर टीका केली असून काँग्रेसने ती बंद करण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.