लाडक्या बहिणींना सरकारचं गिफ्ट, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा होणार ‘इतका’ सन्माननिधी
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना, जी महायुती सरकारच्या काळात सुरू झाली, तिच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ७ मार्चपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण ३००० रुपये जमा होतील. आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात.