उद्या कोण-कोण शपथ घेणार? भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्टच सांगितलं
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असून, दोन उपमुख्यमंत्रीही असतील. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून गोंधळ निर्माण झाला होता. अखेर एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्याने फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला. उद्याच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.