“मी विरोधकांच्या आरोपांना…”, उज्ज्वल निकम यांचा पलटवार
मस्साजोग ग्रामस्थांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी, यासाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकम यांची नियुक्ती केली. निकम यांनी ग्रामस्थांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले. यानंतर माध्यमांशी बोलत असताना वकील उज्ज्वल निकम यांनी विरोधकांवर पलटवार केला.