“…म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, शिवराज राक्षेने सांगितलं मॅटवर नेमकं काय घडलं?
अहिल्यानगरमध्ये रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी पार पडली. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला. उपांत्य फेरीत शिवराज राक्षे विरुद्ध मोहोळ यांच्यातील सामन्यात पंचांनी ४० सेकंदात मोहोळला विजयी घोषित केलं. या निर्णयावर शिवराजने आक्षेप घेतला व पंचाला लाथ मारली. त्यामुळे शिवराजला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. शिवराजने पंचांच्या निर्णयावर टीव्ही ९ ला प्रतिक्रिया दिली.