RTE प्रवेश लॉटरी आज जाहीर होणार, इथे पाहा पूर्ण यादी
महाराष्ट्र RTE कायद्याअंतर्गत २५ टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. निवड यादी आज जाहीर होणार असून, पालकांनी १४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पडताळणीसाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पात्र विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळतो आणि शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून केली जाते.