मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा; “संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना अटक करा…
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने राज्यात तीव्र पडसाद उमटले. मुख्य संशयित वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला असला तरी काही आरोपी फरार आहेत. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. जरांगे म्हणाले की, सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे.