Microsoft चे सीईओ सत्या नडेलांनी केलं कौतुक, शरद पवारांनी मानले आभार; नेमकं काय घडलं?
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी शरद पवारांनी स्थापन केलेल्या बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) चे कौतुक केले आहे. नडेला यांनी बारामतीला भेट देऊन ADT च्या कामाची पाहणी केली आणि त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्यदायी व टिकाऊ उत्पादनं घेण्यात मदत केल्याबद्दल प्रशंसा केली. शरद पवारांनीही नडेलांचे आभार मानले आहेत. ADT ची स्थापना 1968 साली शरद पवार व आप्पासाहेब पवार यांनी केली होती.