संतोष देशमुख प्रकरणावरुन राज ठाकरेंची टीका, “बीडमध्ये राखेतून गुंड…”
राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करत बीडमधील गुंडगिरीवर टीका केली. राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावरही भाष्य केलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी राजकीय पक्षांवर लोकांना जातीपातीत अडकवण्याचा आरोप केला आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर लक्ष देण्याचं आवाहन केलं.