“नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!
कोलकाता रुग्णालयातील बलात्कार प्रकरणानंतर मुंबईतील नायर रुग्णालयातही प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याचे समोर आले आहे. संबंधित प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून आवाज उठवला आहे. सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्र आणि अन्य समित्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनी पुरावे दिले असून, योग्य कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.