आता ‘या’ महिलांनाही मिळणार महिना १५००, आदिती तटकरेंनी दिली माहिती
विधानसभा निवडणुकांदरम्यान लाडकी बहीण योजनेच्या भवितव्यावर चर्चा झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने डिसेंबरचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी व्हिडीओद्वारे ही माहिती दिली. योजनेत १२ लाख नव्या महिलांचा समावेश होणार असून, आधार सीडिंग झालेल्या महिलांना लाभ दिला जाईल. हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे.