“मुंबईत भाजपाची सत्ता, मारवाडीतच बोलायचं”, मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी
मुंबईतील मराठी-मारवाडी वाद पुन्हा उफाळला आहे. गिरगावातील खेतवाडी येथे एका मारवाडी दुकानदाराने मराठी महिलेला मराठीत बोलण्यावरून धमकावले. भाजपाच्या सत्तेमुळे मुंबईत मारवाडीतच बोलायचं, असं त्याने सांगितलं. महिलांनी तक्रार केल्यानंतर मनसेने हस्तक्षेप केला आणि दुकानदाराने माफी मागितली. मात्र, अशा घटनांमुळे राज्यात भाषिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.