बाबा सिद्दीकी यांच्यासह झिशान सिद्दीकीही होते रडारवर, हल्लेखोरांचा नेमका कट काय होता?
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री हत्या झाली. झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. आरोपींनी दोघांनाही मारण्याचा कट रचला होता. पोलिसांनी दोन पिस्तूल आणि २८ जिवंत राऊंड जप्त केले आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या सहभागाची चौकशी चालू आहे.