“महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र….”, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०२३ मध्ये मोठी फूट पडली, अजित पवार ४१ आमदारांसह बाहेर पडले. २०२४ च्या निवडणुकांमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना झाला. सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून आल्या, तर अजित पवारांच्या पक्षाचे ४२ आमदार विधानसभेत निवडून आले. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पवार एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या. प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्राचा विकास शरद पवार आणि अजित पवार यांची झालेली चर्चा यावर भाष्य केलं.