Supriya sule and ajit pawar
1 / 30

“अजित पवार आमचं आयुष्य विस्कळीत करून गेले”, सुप्रिया सुळेंचं विधान; म्हणाल्या…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वर्षभरापूर्वी मोठी फूट पडली. अजित पवारांनी ४० आमदारांसह महायुतीला समर्थन दिलं आणि पक्षावर दावा ठोकला. सर्वोच्च न्यायालयाने पक्षचिन्ह आणि नाव अजित पवार गटाला दिलं, ज्यामुळे शरद पवार गटाला धक्का बसला. सुप्रिया सुळे यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना सांगितलं की, अजित पवारांनी बंड केलं ते चुकीचं होतं. नेतृत्त्व मागितलं असतं तर दिलं असतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Swipe up for next shorts
Success Story of Aadithyan Rajesh at the age of 13 he built the company named Trinet Solutions and launched an app
2 / 30

संगणकाची आवड अन् वयाच्या १३व्या वर्षी झाला कंपनीचा मालक; आदित्यन राजेशचा उल्लेखनीय प्रवास

अनेक मुलं त्यांची पॉकेट मनी वाढवण्यावर किंवा शाळेतील अभ्यासाच्या दबावावर लक्ष केंद्रित करत असताना, केरळमधील आदित्यन राजेश याने अगदी लहान वयातच एक IT उद्योजक म्हणून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दुबईमध्ये स्थित असलेला आदित्यन वेब डिझाईन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये स्पेशलायझेशन असलेल्या ‘Trinet Solutions’ चा संस्थापक आणि मालक आहे. त्याचा हा प्रभावशाली प्रवास अगदी तरुण वयातच सुरू झाला, आणि तो सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला.

Swipe up for next shorts
bangalore chef shares experience
3 / 30

“नरकात तुमचं स्वागत आहे…”, बंगळुरूतील शेफनं सांगितला कामाच्या ठिकाणचा धक्कादायक अनुभव!

बंगळुरूतील ३२ वर्षीय शेफ नयनतारा मेनन बागलाने कामाच्या ठिकाणी आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितले की, आलिशान हॉटेलमध्ये १८-२० तास काम करावे लागत होते आणि वैयक्तिक समस्यांकडे दुर्लक्ष करून हसत ग्राहकांचे स्वागत करावे लागत होते. उशीर झाल्यास दोन तास हात वर करून उभे राहावे लागायचे.

Swipe up for next shorts
OTT releases This Weekend
4 / 30

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात OTT वर काय बघायचं? वाचा कलाकृतींची यादी

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर रिलीज होत आहेत. 'ताजा खबर'चा दुसरा सीझन २७ सप्टेंबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. 'लव्ह सितारा' चित्रपट झी 5 वर २७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 'द ग्रेट इंडिया कपिल शो'चा दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर सुरू झाला आहे. 'वाझा: बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज' मल्याळम चित्रपट २३ सप्टेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. 'एलेन डी जेनेरेस: फॉर योर अप्रूव्हल' शो २४ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

Mumbai Rain Update
5 / 30

मुंबईत मुसळधार; रस्त्यांना नद्यांचं रुप, रेल्वेची उशिराने धाव

गेल्या काही दिवसांपासून थांबलेल्या पावसाने आता पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात धुमाकूळ घातल्यानंतर मुंबईत तुफान पाऊस सुरू झाला आहे. यामुळे कार्यालयीन कामे संपवून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल झाले आहेत. मध्य रेल्वे सेवा २०-२५ मिनिटांनी विस्कळीत झाली आहे, तर पश्चिम मार्गावर जलद लोकल १५-२० मिनिटे आणि स्लो लोकल ५-६ मिनिटे उशिराने धावत आहेत.

Bollywood actress Alia Bhatt crop Aishwarya Rai from her Paris Fashion Week photos
6 / 30

आलियाने ऐश्वर्याला फोटोमधून केलं क्रॉप? नेटकऱ्यांची राहाच्या आईवर टीका, पण सत्य काय?

नुकताच 'पॅरिस फॅशन वीक' पार पडला, ज्यामध्ये ऐश्वर्या राय-बच्चन आणि आलिया भट्ट रॅम्प वॉक करताना दिसल्या. ऐश्वर्याने रेड गाउनमध्ये तर आलियाने सिल्वर आणि ब्लॅक ड्रेसमध्ये रॅम्प वॉक केला. आलियाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले, ज्यात ऐश्वर्या दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

Ajit pawar and Sharad Pawar
7 / 30

Ajit Pawar : “मी शरद पवारांच्या डोळ्यांत डोळे घालून…”, अजित पवारांच्या विधानाची चर्चा!

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांसह पक्षावर दावा ठोकून महायुतीत प्रवेश केला आणि उपमुख्यमंत्री पद मिळवले. यामुळे त्यांना शरद पवारांपासून वेगळं व्हावं लागलं. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी सांगितलं की, राजकीय मतभेद असूनही कुटुंबात सण साजरे करतात. शरद पवारांसमोर मान खाली घालतो, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री होण्याची इच्छा असूनही संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Mohsin Akhtar Mir video after divorce news
8 / 30

उर्मिला मातोंडकरपासून घटस्फोटाच्या वृत्तानंतर मोहसीनची पहिली पोस्ट, ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री व राजकारणी उर्मिला मातोंडकर हिने पती मोहसीन अख्तर मीरपासून विभक्त होण्यासाठी चार महिन्यांपूर्वी घटस्फोटाचा अर्ज दिला आहे. २०१६ मध्ये लग्न केलेल्या या जोडप्याने ८ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोट परस्पर सहमतीने होत नसल्याचे समजते. मोहसीन सध्या काश्मीरमध्ये असून, त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Cabinet Secretariat Recruitment 2024 in marathi
9 / 30

महिना ९५ हजार कमावण्याची संधी, मंत्रिमंडळ सचिवालयात १६० जागांसाठी भरती

Cabinet Secretariat Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. कारण- मंत्रिमंडळ सचिवालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सचिवालय भरती २०२४ संदर्भात सचिवालयाने अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) पदांच्या एकूण १६० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून, या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा.

priya bapat surpasses Aishwarya Rai Bachchan
10 / 30

मराठमोळ्या प्रिया बापटने ‘या’ बाबतीत ऐश्वर्या राय बच्चनला टाकलं मागे

मराठमोळ्या प्रिया बापटने आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. तिच्या वेब सीरिज 'रात जवान है’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रिया बापटने आनंद व्यक्त करत आयएमडीबी आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. ईशान खट्टर पहिल्या क्रमांकावर आहे. ऐश्वर्या राय तिसऱ्या तर, सोहम शाह पाचव्या स्थानावर आहे. विक्रांत मॅस्सी आणि तृप्ती डिमरी अनुक्रमे ९व्या आणि ८व्या स्थानावर आहेत.

control your blood sugar level
11 / 30

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे १० पदार्थ खाल्लेच पाहिजेत! तज्ज्ञांचा सल्ला

तुम्ही आरोग्यास हानिकारक ठरणारे पॅकेज किंवा प्रकिया केलेले पदार्थ निवडत असाल तर तुमची निवड चुकत आहे. त्याऐवजी जर पोषकतत्व देणारे पदार्थ निवडले तर आपल्याला आरोग्य जपता येईल. याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना पोषणतज्ज्ञ शिखा गुप्ता यांनी १० अशा पदार्थांबाबत सांगितले, जे इन्सुलिन रेझिस्टन्सवर अत्यंत प्रभावी आहेत.

Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
12 / 30

“हे एन्काउंटर असू शकत नाही”, अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे!

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायालयाने या एन्काउंटरला संशयास्पद ठरवले असून, पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. न्यायालयाने जखमी पोलिसांचे वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक लॅबचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि आरोपीच्या हातात पिस्तुल कशी आली यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Nausheen Ali Sardar brother passed away
13 / 30

भावाचं निधन झालं अन् अभिनेत्रीला माहीतच नव्हतं, सेटवरील ‘नो फोन पॉलिसी’मुळे घडला प्रकार

टीव्ही अभिनेत्री नौशीन अली सरदारच्या मोठ्या भावाचं १६ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 'वसुधा' मालिकेच्या सेटवरील 'नो मोबाईल पॉलिसी'मुळे तिला ही बातमी दोन तास उशिरा कळली आणि ती वेळेवर घरी पोहोचू शकली नाही. नौशीन अजूनही या दुःखातून सावरलेली नाही आणि सध्या तिच्या आई आणि वहिनीची काळजी घेत आहे.

Black Friday movie controversy
14 / 30

घाबरलेल्या अनुराग कश्यपने परदेशात पळवलेल्या ‘या’ बंदी घातलेल्या सिनेमाच्या DVD

बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपचा पहिला चित्रपट 'ब्लॅक फ्रायडे' वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. २००४ मध्ये प्रदर्शित होण्याच्या एक दिवसाआधी त्यावर बंदी घालण्यात आली होती. सेन्सॉर बोर्डाच्या बंदीमुळे अनुरागने चित्रपटाच्या डीव्हीडी परदेशात फुकट वाटल्या. हा चित्रपट डॅनी बॉयलपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर भारताच्या सरन्यायाधीशांनी चित्रपट प्रदर्शित व्हावा, असा मुद्दा मांडला. अखेर २००७ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला.

pm narendra modi in haryana
15 / 30

“काँग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षणविरोध, त्यांची चौथी पिढी…”, मोदींचा सोनीपतमध्ये हल्लाबोल!

हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनीपत येथे काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेसच्या १० वर्षांच्या कारभारात भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. मोदींनी काँग्रेसला हरियाणाला दलाल व जावयांच्या हाती सोपवल्याचं सांगितलं. तसेच, काँग्रेसच्या डीएनएमध्ये आरक्षणविरोध असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हरियाणात ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

Bigg Boss 18 Sukh Mhanje Nakki Kay Asta fame Sayli Salunkhe NOT A Part Of Salman Khan Show
16 / 30

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीने सलमानच्या लोकप्रिय शोची ऑफर नाकारली

'बिग बॉस १८' या लोकप्रिय वादग्रस्त शोची जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ६ ऑक्टोबरपासून शो सुरू होणार आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत झळकलेल्या सायली साळुंखेला या शोची ऑफर देण्यात आली होती, पण तिने ती नाकारली. यासंदर्भात सायलीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

Arbaz Khan girlfriend took big decision
17 / 30

अरबाज पटेलच्या मनात निक्कीसाठी भावना, त्याची गर्लफ्रेंड म्हणाली, “आता स्वतःची…”

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे चर्चेत आलेल्या अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीच्या जवळिकीबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. अरबाजने निक्कीबद्दल भावना व्यक्त केल्यावर त्याची गर्लफ्रेंड लीझा बिंद्राने नाराजी व्यक्त केली. लीझाने इन्स्टाग्राम सोडण्याचा निर्णय घेतला असून, तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे. लीझाने अरबाजविरोधात पोलीस तक्रार करण्यास नकार दिला आहे.

mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul welcome her little brother watch video
18 / 30

फुग्यांनी सजलेली गाडी, फुलांचा वर्षाव अन्…, मायराच्या चिमुकल्या भावाचं ‘असं’ झालं स्वागत,

लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळ मोठी ताई झाली आहे. तिची आई श्वेता वायकुळ यांनी १५ सप्टेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला. मायराच्या सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली होती. नुकतंच मायराच्या छोट्या भावाचं घरी जल्लोषात स्वागत झालं, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मायरा आपल्या छोट्या भावाला घरी आणताना नाचत फुलं उधळताना दिसत आहे.

Gold price Today
19 / 30

सोनं महागलं! दहा ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे…

गणेशोत्सवादरम्यान सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती. गणेशोत्सवानंतर पु्न्हा सोने चांदीचे दर घसरले होते. सोने चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता पण आता पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

cji dhananjay chandrachud karnataka high court judge vural video pakistan
20 / 30

‘पाकिस्तान’च्या उल्लेखावरून सरन्यायाधीशांनी न्यायमूर्तींना सुनावलं; म्हणाले, “भारतातल्या…

कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती व्ही. श्रीशानंदन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांनी बंगळुरूतील मुस्लीमबहुल भागाला 'पाकिस्तान' म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सू-मोटो दखल घेतली आणि न्यायमूर्तींना परखड शब्दांत सुनावले. न्यायमूर्ती श्रीशानंदन यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे प्रकरण आटोपले. सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी करताना काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

Surya transit in libra
21 / 30

पैसाच पैसा! सूर्याच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार यश आणि भौतिक सुख

सूर्याचे तूळ राशीत प्रवेश: हिंदू पंचांगानुसार शारदीय नवरात्री ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान असेल. सूर्य १७ ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे काही राशींना विशेष लाभ होईल. मेष राशीच्या व्यक्तींना मानसन्मान, वर्चस्व आणि आर्थिक स्थिरता मिळेल. कर्क राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये यश, अडथळे दूर होतील आणि आईबरोबरचे नाते घट्ट होईल. धनु राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ, उत्पन्नाचे नवे मार्ग आणि आर्थिक लाभ मिळतील.

Bigg Boss Marathi 5 Winner
22 / 30

सूरज चव्हाण, अंकिता नव्हे तर ‘हा’ सदस्य असणार Bigg Boss Marathi 5 चा विजेता?

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यंदाचे पर्व ७० दिवसांत संपणार असून, विजेता कोण असणार याबाबत एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोनुसार, वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार एलिमिनेट होतील. निक्की तांबोळी चौथी रनर-अप, जान्हवी तिसरी रनर-अप, सूरज तिसऱ्या क्रमांकावर, आणि अभिजीत सावंत विजेता ठरेल.

Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet sawant mimicry of nikki tamboli video viral
23 / 30

अभिजीत सावंतने निक्की तांबोळीची केली जबरदस्त नक्कल, व्हिडीओ पाहून तुम्हाला होईल हसू अनावर

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा समारोप ६ ऑक्टोबरला होणार आहे. सध्या नववा आठवडा सुरू असून, आठ स्पर्धक उरले आहेत. या आठवड्यात सर्व स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. अशातच अभिजीत सावंतचा निक्कीची नक्कल करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काहींना हा व्हिडीओ मजेशीर वाटला, तर काहींनी टीका केली आहे.

Bigg Boss 18 Confirmed 6 Contestants On Salman Khan's Show watch list
24 / 30

सलमानच्या बहुचर्चित ‘बिग बॉस’साठी सहा स्पर्धकांवर शिक्कामोर्तब, ‘हा’ मराठी चेहरा झळकणार

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वानंतर हिंदीतील 'बिग बॉस'चं १८वं पर्व ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सलमान खानच्या प्रोमोमधून शोच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली. या पर्वात निया शर्मा, शोएब इब्राहिम, धीरज धूपर, नायरा बनर्जी, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे ही सहा स्पर्धक निश्चित झाले आहेत. यामध्ये एक मराठी चेहरा झळकणार आहे.

Who is Mohsin Akhtar Mir Urmila Matondkar Divorce
25 / 30

Urmila Matondkar Divorce: कोण आहे मोहसीन अख्तर मीर, काय करतो? जाणून घ्या

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि तिचा पती मोहसीन अख्तर मीर ८ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होणार आहेत. उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मोहसीन काश्मीरचा असून, तो अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला होता. त्याने काही चित्रपटांमध्ये काम केले पण यश मिळाले नाही. सध्या तो फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राबरोबर काम करतो. उर्मिला आणि मोहसीन यांचा घटस्फोट परस्पर सहमतीने होत नसल्याचे वृत्त आहे.

Urmila Matondkar files for divorce from husband Mohsin Akhtar Mir
26 / 30

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोटासाठी केला अर्ज

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. उर्मिला पती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. उर्मिलाने आठ वर्षांपूर्वी काश्मिरी व्यावसायिक व मॉडेल असलेल्या मोहसीनशी आंतरधर्मीय लग्न केलं. आता दोघांच्याही नात्यात दुरावा आला आहे, असे वृत्त आहे.

Chhaya Kadam first post after Laapataa Ladies goes to Oscars 2025
27 / 30

“माझ्या वाट्याला ‘लापता लेडीज’च्या…”, चित्रपट ‘ऑस्कर’ला गेल्यावर छाया कदम यांची पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. 'कान फिल्म फेस्टिव्हल २०२४'मध्ये त्यांच्या 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' चित्रपटाला पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांचा 'लापता लेडीज' चित्रपट 'ऑस्कर' २०२५ साठी भारताकडून निवडला गेला आहे. या चित्रपटात छाया कदम यांनी मंजू माईची भूमिका साकारली होती. 'लापता लेडीज' चित्रपट 'ऑस्कर'ला गेल्यानिमित्ताने नुकतीच छाया कदम यांनी पोस्ट शेअर केली आहे.

Tanuj Virwani-Tanya Jacob blessed with baby girl
28 / 30

दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री झाली आजी, सूनेने लेकीला दिला जन्म

बॉलीवूड September 25, 2024

बॉलीवूड अभिनेता तनुज विरवानी आणि त्याची पत्नी तान्या जेकब यांना मुलगी झाली आहे. तनुजने इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली. अभिनेत्री रती अग्निहोत्री आता आजी झाल्या आहेत. तनुज आणि तान्याने २५ डिसेंबर २०२३ रोजी लोणावळ्यात लग्न केले होते. तनुजने 'वन नाइट स्टँड', 'पुरानी जीन्स', 'योद्धा', 'कोड एम' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sunita Willams Returns to earth
29 / 30

सुनिता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्याकरता ‘हे’ दोन अंतराळवीर करणार मदत!

देश-विदेश September 25, 2024

नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर (आयएसएस) अडकले आहेत. त्यांच्या यानात बिघाड झाल्याने परतीचा प्रवास लांबला आहे. त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांच्या नेतृत्वाखालील स्पेस एक्स क्रू ९ मोहिमेचे प्रयत्न सुरू आहेत. हेग आणि गोर्बुनोव्ह तांत्रिक समस्यांचे निराकरण करून सुनीता आणि विल्मोर यांना सुरक्षित परत आणण्यासाठी सज्ज आहेत.

Google Trending Personal Loans in Marathi
30 / 30

पर्सनल लोनच्या मागणीत वाढ! गुगल ट्रेंड काय सांगतोय? कोणत्या बँका देतात स्वस्तात कर्ज?

Personal Loans : देशात सणासुदीच्या हंगामात कर्जाच्या मागणीत प्रचंड वाढ होत असते. हल्ली लोकं विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी लोनचा पर्याय निवडताना दिसतात. मोबाइल, घरातील लहान-मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून अनेक गोष्टी लोनवर खरेदी करतात. इतकंच नाही तर आता अनेक ऑनलाइन वेबसाइटवर महागडे कपडेही इएमआयवर खरेदी करण्याचा ऑप्शन दिला जातो. यांसारख्या अनेक कारणांमुळे आता गूगल ट्रेंड्सवरही पसर्नल लोन कीवर्ड ट्रेंड होताना दिसतोय.