मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना विरोध, नितेश राणेंनी गटविकास अधिकाऱ्यांना सुनावलं
भाजप नेते नितेश राणे यांनी अहिल्यानगरच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मढी ग्रामसभेच्या मुस्लिम व्यापाऱ्यांवरील बंदीच्या प्रस्तावाला स्थगिती दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ग्रामसभेत मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नसल्याने बंदीचा ठराव मंजूर झाला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली आहे. राणे यांनी ग्रामस्थांना ठरावावर सह्या घेण्याचे आवाहन केले आहे.