घाटकोपरमध्ये टेम्पोने पाच जणांना धडकलं, एका महिलेचा जागीच मृत्यू!
घाटकोपर अपघात: कुर्ला येथील बेस्ट बस अपघातानंतर घाटकोपरमध्ये टेम्पोने चार जणांना धडक दिली. शुक्रवारी सायंकाळी चिराग नगर भागातील मासळी मार्केटमध्ये हा अपघात झाला. या अपघातात प्रीती पटेल (३५) यांचा मृत्यू झाला, तर तीन महिला आणि एक पुरुष जखमी झाले. टेम्पो चालक उत्तम खरात (२५) याला ताब्यात घेण्यात आले असून तो नशेत होता का, याचा तपास सुरू आहे.