पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारकडून ५० लाखांची मदत
पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यात ६ महाराष्ट्रातील होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबांना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, राज्य सरकार या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी घेणार आहे. जगदाळे कुटुंबातील मुलीला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.