‘नागपूर दंगलीचा आधार घेऊन कोरटकर दुबईला पळाला’, अमोल मिटकरींचा आरोप
नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोरटकरला शोधून आणण्याचे आव्हान सरकारसमोर असल्याचे म्हटले आहे.