पुण्यातील ‘त्या’ जुळ्या मुलींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर!
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आगाऊ रक्कम भरण्यास सांगितल्याने गर्भवती महिलेला दाखल करता आले नाही. परिणामी दुसऱ्या रुग्णालयात प्रसुती झाली, परंतु मातेचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी जुळ्या मुलींच्या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले. पीडित कुटुंबीयांनी डॉक्टर घैसास यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.