डॉ. आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सोलापूरकर यांच्याकडून स्पष्टीकरण…
अभिनेता राहुल सोलापूरकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य असलेले व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. सोलापूरकरांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.