राज ठाकरेंच्या भाषणात औरंगजेबाची कबर, वाघ्या कुत्र्याची समाधी यासह काय विषय असू शकतात?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानावर सभा आहे. या सभेत ते हिंदुत्व, औरंगजेबाची कबर, महाराष्ट्रातील राजकारण, महापुरुषांचा अवमान, मराठी-इतर भाषिक वाद यावर भाष्य करू शकतात. कामचुकार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी आणि महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची घोषणा यावरही ते बोलू शकतात. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देणार का, हेही महत्त्वाचं आहे.